गोवंश हत्या बंदी कायदा केला आहे, काही दिवसांनी श्वास घेण्यावर बंदी घालतील

 

गोवंश हत्या बंदी कायद्यावर आता दिगदर्शक नागराज मंजुळे यांनी आपले रोखठोक मत मांडले आहे. काही समाजांमध्ये परिस्थितीमुळे मांसाहार करावा लागतो तसेच आपल्याकडे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे, काही दिवसांनी श्वास घेण्यावर बंदी घातल्यास आश्चर्य वाटायला नको असेही मंजुळे म्हणाले. पुण्यात शहीद भगतसिंह स्मृतीदिनानिमित्त भगतसिंह विचारमंचाने नास्तिक मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात नागराज मंजुळे यांनी आपले विचार स्पष्ट केले.

नागराज मंजुळे म्हणाले की माणूस जन्मतःच नास्तिक असतो. जे लोक वैफल्यग्रस्त असतो त्यांना देवाची गरज असते. जे लोक तर्क लावून विचार करतात त्यांना लोकांना देवाची गरज नसते. आपल्या देशात देव आणि धर्माच्या नावाने खूप हिंसा आणि रक्तपात झाला आहे, परंतु एका नास्तिकाला काफिर आणि दारूडे आणि वाईट असल्याचा अफवा पसरवल्या जातात असेही मंजुळे म्हणाले.

तसेच शाकाहार मांसाहार ही कल्पना फक्त आपल्या भारतात आहे. अनेक समाजात आजही मांसाहार केवळ परिस्थितीमुळे करावा लागतो असे मंजुळे म्हणाले. आपल्याकडे अनेक राज्यांत गो वंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आल आहे. काही दिवसांनी श्वास घेण्यावर कर लावतील, उद्या श्वास घेण्यासही बंदी घातली तर आश्चर्य वाटायला नको असेही मंजुळे म्हणाले.

Team Global News Marathi: