सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो जागे व्हा..!!

सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो जागे व्हा..!!

तानाजी सुरवसे

उस्मानाबाद च्या नॅचरल शुगरची 2880 रु पहिली उचल जाहिर; सोमेश्वर कारखान्याची 3000 रु पहिली उचल जाहीर सोलापूर जिल्ह्यातील चेरमन म्हणतात सभासद बंधुनो भरपूर ऊस द्या, या वर्षी आपण विक्रमी गाळप करू,आपला कारखाना गाळपात आणि साखर उत्पादनात एक नंबर ला राहिला पाहिजे..!!! सभासद म्हणतो तेही मनातल्या मनात; साहेब दराच काय..?

काटा तेव्हढा मारू नका.? रिकव्हरी वर एफ आर पी ठरतोय ती तेव्हढी दाबू नका..!! चेरमन साहेब आहो तुम्ही अजून चार कारखाने काढा तेव्हढा ऊस उत्पादीत आम्ही करू पण कधीतरी दराच,एफ आर पी चं, पहिल्या उचलीचं स्पष्टपणे बोला की राव, तुम्ही निष्कलंक आणि प्रामाणिक असेल तर वजन काटा कुठं बी करू द्या शेतकऱ्यांना, आम्ही रिकव्हरी चोरी करत नाही असं ठामपणे सांगा व लिहा कारखान्याच्या ऑफिस मध्ये, गेटवर,वजन काट्यावर,ट्रॅक्टरवर लिहा की आमचा कारखाना काटा मारत नाही…!!

आणि शेतकऱ्यांच्या पोरांनो किती दिवस गप्प बसणार…??? किती दिवस तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणार..??? तुमच्या बापाच्या कष्ठाच्या जीवावर ते कधीकाळी सामान्य असलेले लोक कारखानदार, आमदार, खासदार झाले,गडगंज संपत्ती कमवली त्यांनी, त्यांच्या सावपणावर जाऊ नका, ते फक्त साव पणाचा आव आणतात,त्यांची रिअल लाईफ डोळे उघडून बघा जरा.

त्यांचे राहण्याचे स्टँडर्ड तपासून पहा, त्यांचं कुटुंब, कुटुंबातील सदस्य कशी राहतात बघा, त्यांची मुलं कुठं शिकतात,कशी राहतात, तेही बघा… त्यांचे कुटुंबच नाही तर पाव्हणे रावळे, सासू सासरे मेव्हणे,मेव्हण्या, भाचे- मामे त्यांची कुटुंब आणि त्यांचं राहण्याचं स्टॅंडर्ड पहा…!! आणि मग आपली लेकरं बाळं, आपलं कुटुंब आणि आपल्या जगण्याचं स्टॅंडर्ड पहा, आपला नुसता मोठेपणा आणि त्यातील खोटेपणा पहा.

त्यांची कोट्यवधींची विविध शहरातील, राज्यातील आणि देशाबाहेरील गडगंज संपत्ती पहा आणि आपला कर्जबाजारी पणा पण पहा, आपल्यावर राहिलेली जमीन विकायची वेळ का आली ते पण पहा…!!

दादा-मामा-नाना-मालक-भैय्या करत फिरणं बंद करा, जरा स्वतःच्या लेकरा बाळाचं भविष्य बघा, थोडं कुटुंब सेट्टल करायचं बघा..!! लढा रे भावांनो..!!

आवाज आवाज उठवा; गप्प बसू नका कुठं तरी फालतू चॅटिंग करत आपल्या आई बापाशी चिटिंग करू नका, त्याच्या कष्ठाशी बेटिंग करू नका, लिहा, बापाची समस्या फेसबुक;वॉट्सप्प वर मांडा, लाईक कंमेंट येतील किंवा येणार पण नाहीत, पण तुमचं लिखाण, तुमचा स्पष्ट वक्तेपणा शेतकऱ्यांच्या जातिवंत पोरांना अवडेल, तुमचं तेच लिखाण, तुमचे मोडके तोडके चार शब्द मुजोर आणि निर्ढावलेल्या व्यापारी,कारखानदार यांच्या मनात धडकी भरवतील…!!

व्यक्त व्हा, तुमच्या हातातील हा मोबाईल, खिशातील पेन आणि डोक्यातील विचार क्रांतीच्या मशाली पेटवतील, आणि तुमच्या बापाच्या कष्ठाला न्याय मिळेल…!! तुम्ही जेंव्हा बंड करून उठाल तेव्हा हे कारखानदार, व्यापारी थंड पडतील, तुमच्या मालाला भाव मिळेल आणि मगच तुमची परिस्थिती सुधारेल अन्यथा तुम्ही जिथे आहात तिथेच झुरून मराल…!!

कारण आज तुम्ही ज्यांची हांजी हांजी करत आहात, त्यांना तुम्ही आणि तुमची परिस्थिती सुधारलेली कधीही आवडणार नाही, तुम्ही गुलाम कार्यकर्ते म्हणूनच त्यांच्या पायाशी राहावे ही त्यांची प्रामाणिक इच्छा असते, म्हणून ते तुमच्या शेतमालाच्या भावाविषयी,तुमच्या करिअर विषयी कधीच सकारात्मक असणार नाहीत…!!

म्हणून तुमचं विश्व आणि व्यक्तिमत्त्व तुम्ही स्वतः निर्माण करा..!! सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार लोकांना मीडिया च्या माध्यमातून सतत प्रश्न विचारा, दराबद्दल,काटामारी,रिकव्हरी चोरी या वरती आवाज उठवा, त्यांची पेरलेली माणसं सोसिएल मीडिया वरील अपडेट दररोज घेत असतात,शेतकऱ्यांच्या मनातील खदखद, ज्वालामुखी उद्रेक त्यांना कळू द्या, आपली ही थेरं जास्त काळ चालणार नाहीत, ते त्यांना समजू द्या..!! घाबरू नका, तुम्ही तुमचे मालक आहात, आचार आणि विचार तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला घटनेनं दिलं आहे…..!!

ग्लोबल न्युज नेटवर्क: