शुगर- बीपीचा त्रास नको म्हणून गृहखाते नाकारलं- जयंत पाटील

 

सांगली | राज्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वर्णी लागू शकते अशी सहायता वर्तवळील जात होरी. मात्र रास्तवडीकडून दिलीप वळसे पाटील यांनीं गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यातच आता गृहमंत्री पद न स्वीकरण्याचे कारण सांगली येथील एका कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

 

पाटील भाष्य करताना डायबिटीस आणि बीपीचा त्रास नको म्हणून मी गृहमंत्री पद नाकारलं अशी कबुली दिली. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी आर आर पाटील यांच्यासोबत झालेला एक किस्साही सांगितला.

जयंत पाटील म्हणाले, २००९ मध्ये गृहखाते घेण्याआधी एका लग्नाकार्यात आर आर आणि मी दोघे गेलो होतो. त्यावेळी आपण आबांना विचारले, गृहखाते कसं असतं? त्यावेळी आबांना मला विचारले की ? तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा शुगर आहे का? मी आबांना सांगितलं, मला अजिबात त्रास नाही.

 

त्यावर आबा म्हणाले गृहखाते घ्या, तुम्हाला दोन्ही गोष्टी सुरू होतील.आणि गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला,आपल्या खासगी सचिवालाही ब्लड प्रेशर सुरू झाले, इतके तणावपूर्ण काम असते, त्यामुळे तेव्हापासून माझं मत आहे, की आता ब्लड प्रेशर सुरू झाले आहे, शुगर मागे लावून घ्यायचा नाही,अ शी आपली भूमिका आहे.

Team Global News Marathi: