पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणि देशात घुसलेल्या चीनबाबत मोदीजी चिडीचूप बसतात

 

देशात सध्या दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आज वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला असून त्याचे घराचे बजेट बिघडले आहे तर कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत त्याचप्रमाणे चीनची घुसखोरी अद्याप सुरूच असलेली दिसून येत आहे. याच मुद्द्यावरून आता खासदार ओवेसी यांनी थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ओवैसी म्हणाले की पंतप्रधान मोदी काही बाबतीत अजिबात तोंड उघडत नाहीत, ते जाणीवपूर्वक मौन बाळगतात.यात एक म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणि देशात घुसलेला चीन याबाबत मोदीजी चिडीचूप आहेत. कारण ते चीनला घाबरतात अशी टीका ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

ओवैसी म्हणाले की, पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र, त्याबद्दल पंतप्रधान शांतच बसतात.पेट्रोल-डिझेलची सेंच्यूरी झालीय, मात्र पंतप्रधान म्हणतात, मित्रो, फिकर मत करो! तर दुसरीकडे चीन आपल्या देशात तळ ठोकून बसला आहे. जेंव्हा पुलवामा हल्ला घडला तेंव्हा मोदींनी म्हटलं होतं की, घर में घुस के मारेंगे! आम्ही म्हटलं, मारा! मात्र, आता चीन आपल्या देशात घुसून बसला आहे,तरीही मोदी काहीच करत नाहीयेत.अस देखिल ओवैसी म्हणाले.

 

Team Global News Marathi: