अचानक आघाडी सरकारमधील सर्वच मंत्री पॉझिटिव्ह कसे ? संदीप देशपांडे यांचा सवाल

राज्यात मागच्या काही दिवसांपासून आघाडी सरकारमधील डजनभर मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. या संदर्भात आता महाराष्ट्र नवनिर्मान सेना सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित करत ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.

“अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आज सकाळी मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यावरूनच देशपांडे यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.

यावर बोलताना देशपांडे म्हणाले की, “सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असे आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे असा टोला देशपणे यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.

मुख्यमंत्री साहेबाना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का? तुम्हाला घरी बसायचं आहे तर बसा पण लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवू नका असं सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: