कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी बंद

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर पडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शेगावचे गजानन महाराज मंदिर पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापकांनी घेतला आहे.

तसेच विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातही ५६ तास बंद करण्यात आलं आहे. यावेळी भाविकांना दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये तसेच कोरोना संदर्भातील नियम काटेकोडपणे पाळावे असं आवाहन करण्यात आले आहे.

अमरावतीत रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनसदृष स्थिती आहे. विदर्भातल्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यांसाठी संचारबंदीचे आदेश अधिक कडक केले आहेत.पुढील आदेशापर्यंत देऊळ बंदचा निर्णय श्री संत गजानन महाराज संस्थानेतनं घेतला आहे.

Team Global News Marathi: