ऊसाच्या पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोग ; चार एकरात 12 लाखाचा निव्वळ नफा,आंतरपीकानेही दिली साथ

ऊसाच्या पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोग ; चार एकरात 12 लाखाचा निव्वळ नफा

सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस पट्ट्यात शीतल दिलीप सूर्यवंशी या एमबीए तरुणाने चार एकर पेरु शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. उसाच्या जोडीला पेरूची शेती आश्‍वासक ठरत असून, एकरी ३ लाखापर्यंत निव्वळ फायदा मिळवत आहेत. आता पेरू प्रक्रियेसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.  

प्रसिद्ध तिर्थक्षेत्र औदुंबरजवळ अंकलखोप हे गाव असून, कृष्णा नदीच्या पाण्याने हा परिसर संपन्न झालेला आहे. येथील शीतल दिलीप सूर्यवंशी यांनी व्यवस्थापनातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. सध्या ते सध्या पीएच.डी. करत असले तरी त्यांचा मुख्य ओढा शेतीकडेच आहे. त्यांची वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. सूर्यवंशी कुटुंब हे उच्चशिक्षित असून, शीतल यांचे वडील दिलीप बी. एस्सी. आहेत. चुलते डॉ. राजेंद्र सूर्यवंशी हे कृषी महाविद्यालयात प्राचार्य आहेत. तर शीतल यांचा एक भाऊ डॉक्टर, एक आर्किटेक्चर आहे. 

प्रयोगशील वृत्तीतून वळले पेरूकडे


वडील शेती करत असताना पूर्वी चार एकर द्राक्षबाग होती. महाविद्यालयीन शिक्षण घेताना शीतल त्यात मदत करायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शेतीपूरक व्यवसायात लक्ष घातले. पीक अवशेषांपासून इंधन बनवण्याचा व्यवसाय सचिन सपकाळ या मित्रासह भागीदारीत सुरू केला आहे. त्याचाही व्याप वाढत आहे. या व्यवसायानिमित्त विविध शेतकऱ्यांच्या व उद्योजकांच्या नेहमीच भेटी होत असतात. २०१५ मध्ये नगर परिसरात उत्तम पेरूच्या बागा पाहिल्या. आपल्या शेतीतही हा प्रयोग करण्याचा निश्चय केला. वडिलांच्या परवानगीने चार एकर शेतीवर पेरू लागवडीचा प्रयोग करायचे ठरले. अन्य शेतकऱ्यांकडूनही पिकाची व्यवस्थित माहिती घेतली. बाजारपेठ आणि जमिनीचा विचार करून त्यांनी ललित व जी. विलास या वाणांची निवड केली आहे. घरातून हट्टाने परवानगी घेतल्यामुळे उत्पादन मिळवण्याचीही तितकीच जबाबदारी होती. त्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा – मुख्यमंत्री

पेरू लागवड व्यवस्थापन

नऊ बाय सहा फूट अंतरावर रोपांची लागवड

रोप लागवडीवेळी खड्ड्यांमध्ये शेणखत, निंबोळी पेंड आदींचा वापर केला.

पहिल्या लागवडीत झाडे लवकरात लवकर सशक्त करून घेतली. सामान्यतः दीड वर्षानंतर शेतकरी फळे धरतात. मात्र, शीतल यांनी तेराव्या महिन्यात फळे घेण्यासाठी प्रयत्न केले.

कंगनाने ड्रग्ज घेतले असल्यास चौकशी व्हावी, प्रवीण दरेकर यांची मागणी

नवीन लागवडीमध्ये मोकळ्या जागेमध्ये भुईमूग लागवड केली. त्यातून २० पोती भुईमूग निघाला. त्यानंतर हरभरा लागवड केली. त्यातून १८ क्विंटल उत्पादन झाले. त्याला ५८०० रुपये दर मिळाला. सर्व खर्च वजा जाता ८० हजार रुपये निव्वळ हाती आले. यातून पेरू रोपांचा खर्च वसूल झाला. 

शेणखत आणि स्लरी वापराभर अधिक भर. रासायनिक खतांचा मर्यादित वापर.

पाण्याचा अतिरेक टाळला जातो. फेब्रुवारी ते मे याच कालावधीत बागेला पाणी दिले जाते. अन्य फारशी आवश्यकता भासत नाही उत्तम गुणवत्तेसाठी कसोशीने प्रयत्न शीतल सूर्यवंशी हे आपल्या पेरू बागेचे दोन हंगाम धरतात. मार्चला छाटणी घेऊन जूनचा हंगाम धरतात. ऑगस्ट छाटणी घेऊन जानेवारीचा हंगाम धरतात. या दोन्ही हंगामात द्राक्षे बाजारात नसतात. त्यामुळे पेरूला बऱ्यापैकी दर मिळतो, असा त्यांचा अनुभव आहे. छाटणीनंतर बोर्डो मिश्रणाच्या फवारणीद्वारे बाग निर्जंतुक केली जाते. फुटव्यासाठी ठिबकमधून खते सोडली जातात. नत्राचा वापर शिफारशीइतकाच केला जातो. 

सोलापूर शहरात 57 तर ग्रामीण जिल्ह्यात 454 कोरोना पॉझिटिव्ह

फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निमतेलाचा वापर केला जातो.

फळमाशीसाठी कामगंध सापळे लावले जाते. एकरी १० घरगुती पद्धतीने तयार केलेले सापळे लावले आहेत. 

दर पंधरा दिवसांनी  विशेषतः अमावस्या, पौर्णिमेला नीमतेलाची फवारणी केली जाते. 

थायपिंक वाणाच्या पेरूला प्लॅस्टिक पिशव्यांचे आवरण घातले जाते. त्यामुळे फळांची गुणवत्ता चांगली राहते. एका झाडावर तीस ते चाळीस फळे ठेवली जातात. एका काडीला एक फळ ठेवले जाते. त्यामुळे ४०० ते ६५० ग्रॅमपर्यंत फळ मिळते. 

नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ? राजकीय चर्चांना उधाण

शेतीची वैशिष्ट्ये 

निचरा होणाऱ्या जमिनीत पेरू लागवडीचा प्रयोग.

संपूर्ण पेरू क्षेत्राचे सिंचन व खत व्यवस्थापन ठिबकद्वारे केले जाते. 

ऊस पट्ट्यात पेरू लागवडीचा वेगळा प्रयोग

रासायनिक व सेंद्रिय खतांचा संतुलीत वापर

उसापेक्षा पेरू लागवड नक्कीच फायदेशीर ठरत असल्याचे शीतल यांचे मत. दोन्हींचे आर्थिक विश्लेषण ते करत असतात.

मराठा आरक्षण, १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद….मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत विविध पंधरा ठराव मंजूर

बाजारपेठ आणि विक्रीचे व्यवस्थापन 

शीतल यांना वर्षभरात दोन्ही हंगामात एकरी १० ते १२ टन पेरूचे उत्पादन मिळते. 

मुंबई, पुणे बाजारपेठेमध्ये थायपिंक आणि जी. विलास वाणांच्या मोठ्या पेरूना मागणी असते. ललितचे पेरू आकाराने थोडे लहान असल्याने सांगली, कोल्हापूर येथे केली जाते. बहुतांश वेळा व्यापारी स्वतः येऊन बागेतून पेरू घेऊन जातात. 

ललित वाणासाठी प्रतिकिलो ३० ते ४० रु., जी विलास वाणासाठी ४० ते ४५ रुपये तर थायपिंकसाठी ८० ते ९० रुपये असा दर मिळतो. 

घरासमोर स्टॉल लावूनही घरातील सदस्य पेरूची विक्री करतात. तर पुणे-बंगळूर हायवेवर एका मोठ्या हॉटेलसमोर दुसरा स्टॉल असतो. भूमी फळ स्टॉल नावाने हे दुकान आहे. तेथे मासिक पगारावर एका तरुणाची नेमणूक केली आहे. दिवसभरात ४० ते ४५ किलो पेरू विकला जातो. परिसरातील काही शेतकऱ्यांचे सेंद्रिय पपई, हळद, मध, गूळ यांचीही येथे विक्री केली आहे. 

शीतल यांच्या मते  उसासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागते. त्या तुलनेत पेरू बागेतून वर्षभर पैसे मिळतात. उसासारखी बिलाची वाट पाहावी लागत नाही. ऊस पिकाच्या शेतीलाही पेरूतून मिळणाऱ्या उत्पन्नाची मदत होते. एकरी सव्वा लाखापर्यंत उत्पादन खर्च येतो.

नुकसान गृहित धरून पुढे गेले पाहिजे…
सुरवातीला दोन एकर व नंतर दोन एकर अशी पेरू लागवड वाढवली. सध्याही वातावरणानुसार पेरू वेगाने पिकल्याने सुमारे दीड ते दोन टन पेरू खराब होतो. ते टाळण्यासाठी पिकलेल्या पेरूवर प्रक्रिया करण्याचा मानस आहे. लॉकडाऊन आणि शीतल व त्यांचे वडील दोघेही कोरोना बाधित झाल्याने संपूर्ण घर व बाग क्वारंटाईन करावी लागली. या काळात बागेमध्ये कामासाठी मजूरांना बोलावता आले नाही. मागील वर्षी पूर परिस्थितीमुळे पेरूचे दर एकदम कमी राहिले. परिणामी मोठे नुकसान झाले. पण असे नुकसान आपण गृहित धरून पुढे गेले पाहिजे, असे शीतल याने सांगितले.  सध्या सहा एकर ऊस आहे. आडसालीचे उत्पादन ७० टनापर्यंत तर खोडव्याचे उत्पादन ५० टनापर्यंत आहे. पेरू लागवडीमुळे चार एकर क्षेत्रातील वाचलेले पाणी ऊस क्षेत्रासाठी वापरता येते. त्यामुळे ऊस उत्पादनही शाश्वत झाले आहे. 

संपर्क- शीतल सूर्यवंशी, ९११२१९१५१३

साभार ऍग्रो वन

ग्लोबल न्युज नेटवर्क: