गुलाबरावांच्या टिकेनतंर राणे पुत्रांचे जोरदार प्रतिउत्तर….!

गुलाबरावांच्या टिकेनतंर राणे पुत्रांचे प्रतिउत्तर….!

नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा TRP म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते अशी टीका राणेंवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती. या टीकेला आता माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

गुलाबराव पाटील किती तास शुद्धीत असतात? ज्यांच्या नावातच गुलाब आहे. त्यांनी धंद्याबद्दल बोलू नये. अशा माणसाबद्दल काय टीका करणार? तुमची उंची किती, नारायण राणेंची उंची किती हे तरी पहा, अशा शब्दात त्यांनी मंत्री पाटलांना टोला लगावला आहे.

“सुपारी चोर गुलाबराव पाटील मंत्री असून ह्याला कुत्रा विचारात नाही.. क्वाटरचे पैसे आमच्यकडून घेऊन जायचा हा.. आता मंत्री झालाय म्हणून बाटली पर्यंत पोहचला आणि क्वाटरचे दिवस विसरला अशी टीका राणे यांनी केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: