मुंबई पालिकेचे “मिशन धारावी” ऑस्ट्रेलियाच्या सरकारी चॅनेलने घेतली दखल…!

मुंबई पालिकेचे “मिशन धारावी” ऑस्ट्रेलियाच्या सरकारी चॅनेलने घेतली दखल…!

दाटीवाटीची वस्ती, अरुंद रस्ते, मोठ्या लोकसंख्याचे प्रमाण या सर्व घटकांमुळे धारावी झोपडपट्टीमध्ये कोरोना संसर्गाचा शिरकाव होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल असेच सर्वांना वाटत होते. मात्र तातडीने मुंबई महानगर पालिकेने राबविलेल्या उपाय-योजनांमुळे तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी मनपाने घेतलेल्या खबरदारीमुळें केवळ धारावीमध्ये दोन आकड्याची कोरोना रुग्णसंख्या उरलेली आहे.

आज बृहमुंबई महानगर पालिकेने धारावीमध्ये कोरोना रुग्ण संख्या रोखण्यासाठी केलेल्या उपाय-योजनांची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेली होती आता त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या सरकारी न्युज चॅनेलने सुद्धा धारावी पॅटर्नचे कौतुक केले आहे. त्यामुळे धारावी पॅटर्नचा डंका आता जगभरात वाजताना दिसून येत आहे.

आज देशभरातील इतर भागात कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत आहे. लोकांच्या मनात प्रचंड प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे. याच पाश्वभूमीवर कोरोना रोखण्यासाठी धारावी पॅटर्न देशाला नवी दिशा दाखवण्याचे काम करत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: