शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांची चप्पलफेक; सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या,”माझे आईवडील, मुलगी…”

शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांची चप्पलफेक; सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या,”माझे आईवडील, मुलगी…”

राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं आक्रमक झालेले कर्मचारी अचानकपणे आज महाविकास आघाडीचे ज्येष्ठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या घराच्या आवारात शिरले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चप्पलफेक केली.

त्यानंतर काही वेळातच शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे सिल्व्हर ओकवर दाखल झाल्या. त्या दाखल होताच एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना घेरलं. त्या वारंवार कर्मचाऱ्यांना शांत बसण्याची विनंती करत होत्या. एसटी कर्मचाऱ्यांशी शांतपणे बोलण्याची विनंती करत होत्या. मात्र तरीही जमावाने आक्रमकता सोडली नाही. सुप्रिया सुळे यांना घेराव घातला. अखेर सुरक्षारक्षक आणि पोलिसांच्या कड्याच्या माध्यमातून मोकळ्या ठिकाणी येत त्यांनी माध्यमांच्या साहाय्याने एसटी कर्मचाऱ्यांना हात जोडून आवाहन केलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी विनंती आहे. मी त्यांना नम्रपणे विनंती केलेली आहे. मी आत्ता त्यांच्याबरोबर ह्या क्षणी बसायला तयार आहे. पण त्यांनी शांततेचा मार्ग धरावा. दगडफेक आणि चपला आमच्यावर फेकून काहीही होणार नाहीये. माझे आईवडील, माझी मुलगी घरात आहेत. पहिली त्यांची सुरक्षितता मला बघू द्या. मी पुन्हा एकदा सांगतेय की मी ह्या क्षणी त्यांच्यासोबत बसायला तयार आहे. पण या वातावरणात चर्चा होणार नाही. या तुम्ही शांततेत बसा मी पुढच्या क्षणी चर्चेला बसायला तयार आहे. माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. माझे आईवडील आणि मुलीला मला भेटून येऊ द्या…मी दोनच मिनिटात तुमच्याशी बोलते”.

साभार लोकसत्ता ऑनलाइन

ग्लोबल न्युज नेटवर्क: