रस्त्यावर उतरून नौटंकी कशाला करताय”, संजय राऊतांनी साधला फडणवीसांवर निशाणा

 

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. खोट्या प्रकरणामध्ये मविआ लोकांच्या चौकशा सुरू होतात तेव्हा भाजपच्या प्रमुख लोकांना गुदगुल्या होतात. आता राज्यातले पोलीस एखाद्या गुन्ह्या प्रकरणी भाजपच्या नेत्यांची चौकशी करू लागतात. तेव्हा त्यांनी त्याला सामोरे जावे, रस्त्यावर उतरून नौटंकी कशाला करताय, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

यावेळी ते म्हणाले की, राज्यातले पोलीस कधीच खोटे पुरावे दाखल करणार नाहीत. असेही त्यांनी म्हटले. जेव्हा मविआ लोकांच्या चौकशा सुरू होतात, अटकेची कारवाई होते तेव्हा भाजपच्या लोकांना गुदगुल्या होतात. त्यावेळी भाजपचे लोक रस्त्यावर उतरून लेझीम खेळायचे बाकी असतात. मात्र आता त्यांच्याविरोधात राज्यातील पोलिसांनी चौकशी सुरू केली तर आरडाओरड सुरू केली आहे.”

दरम्यान यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील पोलीस किती सक्षम आहेत, हे माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे कायद्याने चालणारे राज्य आहे. पोलीस कधीही पुराव्यांशिवाय कारवाई करणार नाहीत. असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: