काय सांगता | चक्क पोलिस चौकीत सुरू होती मद्य पार्टी, तक्रारदार व्यक्तीला करण्यात आली मारहाण

 

नाशिक | नाशिक येथील गंगापूर रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पोलिस चौकीत धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे पोलिसांवर पुन्हा एकदा जोरदार टीका होताना दिसून येत आहे एक तक्रारदार तक्रार देण्यासाठी पोलिस चौकीत गेला मात्र, तेथे चक्क ओली पार्टी रंगल्याचे त्याच्या निदर्शनास आले. हा सर्व प्रकार इतरांना कळू नये म्हणून तक्रारदारास मारहाणही करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिस आयुक्त घेणार का आणि संबंधितांवर कठोर कारवाई होणार का, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बाळासाहेब शिंदे हे डी के नगर पोलिस चौकीमध्ये गेले. मात्र, तेथे गेले असता त्यांना भलताच प्रकार दिसला. चौकीतील पोलिस हे ओली पार्टी करीत होते. टेबलावर मद्याच्या बाटल्या आणि अन्य सामान त्यांनी पाहिले. हा भांडाफोड होऊ नये म्हणून शिंदे यांना चौकीत बसविण्यात आले. तसेच, त्यांना मारहाणही करण्यात आली. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्याचवेळी एक मद्यपी पोलिस तेथून पळून जात होता.

यावेळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी पाठलाग करुन त्याला पकडले. हा सर्वप्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. यासंदर्भात काही जणांनी सहायक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना यांनाही कळविण्यात आला. त्यांनी तातडीने पोलिस चौकी गाठली. तसेच, अन्य वरिष्ठ अधिकारीही तेथे हजर झाले. याप्रकरणी शिंदे यांनी तक्रार दिली असून पोलिस आता पुढे काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Team Global News Marathi: