आयुष्याबद्दल अति विचार करणे सोडून द्या, जरा आयुष्यालाच तुम्हाला आश्चर्यचकित करू द्या. –

आयुष्याबद्दल अति विचार करणे सोडून द्या, जरा आयुष्यालाच तुम्हाला आश्चर्यचकित करू द्या. –

आयुष्याबद्दल अति विचार करणे सोडून द्या, जरा आयुष्यालाच तुम्हाला आश्चर्यचकित करू द्या.

मेराज बागवान

आयुष्य….आयुष्य….म्हणजे काय? विधात्याने दिलेली सुंदर भेट की भेटवस्तूंचा नजराणा….? काय असते हे आयुष्य. आपण तर खूप उत्सुक असतो , खासकरून आपल्या भविष्यातील आयुष्याबद्दल.पुढे काय होईल? कसे होईल? , याकडेच आपले लक्ष लागलेले असते. मग हळूहळू ह्या बद्दलचे विचार वाढू लागतात.आणि जणू विचारांचे काहूरच मनात, डोक्यात वाहू लागते.पण खरेच इतका विचार,सतत भविष्यबद्दलचा विचार करणे योग्य आहे का ? आपण भविष्याचे नियोजन करणे गरजेचे असते.पण याच भविष्याबद्दल ‘अतिविचार’ करून काय उपयोग? म्हणूनच आता ,आयुष्याबद्दल अति विचार करणे सोडून द्या, जरा आयुष्यालाच तुम्हाला आश्चर्यचकित करू द्या.

आयुष्यात विविध प्रकारच्या गोष्टी असतात. अनेक प्रसंग येतात-जातात.वेगवेगळी माणसे ह्या प्रवासात भेटतात. अनेक समस्या येतात-जातात. यश-अपयश चालूच असते.गरिबी-श्रीमंती याचे देखील चक्र चालूच असते. एकूण काय, तर कोणतीच परिस्थिती आयुष्यात कायम नसते.पण आपल्या बाबतीत अनेकदा असे होते की , आपण एकाच गोष्टीवर फार विचार करीत असतो आणि पुन्हा पुन्हा तीच ती गोष्ट उगाळत बसत असतो.कधी कधी तर एखाद्या गोष्टीविषयी अंतिम निर्णय घेऊन देखील अनेकजण पुन्हा त्याच गोष्टीविषयी विचार करू लागतात आणि वर्तमान हरवून बसतात.अगदी विद्यार्थी ते वृद्ध मंडळी असे सर्वच जण कधी ना कधी असे अतिविचार करतात.

काही विद्यार्थी शाळा-कॉलेजात असताना परिक्षेविषयी, अभ्यासविषयी अति विचार करतात.मला चांगले गुण मिळतील ना? पुढे नवीन कॉलेजात ऍडमिशन मिळेल ना? माझा सर्व अभ्यास वेळेत पूर्ण होईल ना? दिलेला प्रोजेक्ट चुकीचा तर होणार नाही ना ? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी दशेत भेडसावतात आणि भविष्याची चिंता करायला भाग पाडतात.

काही नोकरदार व्यक्ती किंवा व्यावसायिक व्यक्ती देखील स्पर्धेला प्रचंड घाबरतात.माझा व्यवसाय टिकेल की नाही? माझा हा प्रोजेक्ट योग्यरीत्या पूर्ण होऊन यशस्वी होईल ना? मला प्रमोशन मिळेल ना? बॉस माझ्यावर नेहमी खुश राहतील ना? स्पर्धकांमधे मी टिकेल ना ? माझी नोकरी टिकेल ना ? मी यशस्वी होईल ना? असे विविध प्रश्न त्यांना सतत पडलेले असतात.आणि मग ते , वर्तमानात राहून योग्य नियोजन करण्याऐवजी भविष्याच्याच चिंतेत आपला अमूल्य वेळ वाया घालवतात.

नात्यांमध्ये, घरामध्ये देखील विविध कारणांमुळे भविष्याची अती चिंता केली जाते.माझे लग्न होईल ना ? विश्वासू जोडीदार मिळेल ना? माझ्या आईचे/वडिलांचे आजारपण संपेल ना? ते लवकर बरे होतील ना? माझा नवरा/माझी बायको माझ्याबरोबर सुखी आहे ना? मी तिच्या/त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकत आहे ना ? मी माझे मत सर्वांपुढे मांडू शकेल ना? घरातील मंडळी काय म्हणतील? माझ्यावर रागावणार तर नाहीत ना? असे बरेच प्रश्न मनात येत असतात आणि मग मन सैरवैर धावत असते. आणि स्वास्थ्य हरवते.

अशा अनेक गोष्टी आपल्यापैकी अनेकजण अनुभवत असतील. प्रत्येकाला वाटते ,माझेच दुःख खूप मोठे आहे.त्यामुळे कोणी मला समजूच शकणार नाही.पण दुःख तर प्रत्येकाला असते. फक्त कोण त्या दुःखाला, समस्येला कसा सामोरा जातो हे फार महत्वाचे असते.जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत हा सुख-दुःखाचा खेळ सुरूच राहणार आहे.एक समस्या संपली की दुसरी तयार असणारच आहे.मग इथे आपण नेहमीच आपला वर्तमान भविष्याच्या चिंतेत वायाच घालवणार का?

आयुष्य हे एक खूप मोठे ‘सरप्राईज’ आहे.कित्येकदा आपण काही गोष्टी ठरवितो, पण नेहमीच आपल्या मनासारखे होत नाही.पण त्याचवेळी दुसरीकडे असे काहीतरी घडत असते जेणेकरून पुन्हा आपण त्या गोष्टीसाठी तयार राहू, त्या साठी प्रयत्न करू.म्हणूनच जेव्हा आपल्या मनासारखे घडताना दिसत नाही , तेव्हा आहे त्या परिस्थतीला स्वीकारता आले पाहिजे.आणि त्यातून बाहेर पडून ,कधी कधी थोडा ‘ब्रेक’ घेऊन पुढे वाटचाल करता आली पाहिजे. हेच तर जीवन आहे.

जेव्हा आपल्याबाबत काहीतरी नकारात्मक घडते तेव्हा दुसरीकडे कोणत्यातरी दुसऱ्या गोष्टीची सकारात्मक सुरवात होत असते. मान्य आहे, आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होतो जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत.पण आपण फक्त ‘प्रयत्न’ करू शकतो.बाकी सर्व त्या ‘निसर्गाच्या’, ‘विधात्याच्या’ हातात असते.म्हणूनच प्रत्येक गोष्टीसाठी विधात्याचे आभार मानता आले पाहिजे.

आता आपल्याला काही गोष्टी नको नकोश्या वाटतात.कधी कधी खूप नैराश्य येते.रडू येते, रागही येतो.खूप काही बोलावेसे वाटते पण बोलू शकत नाही.या परिस्थतीत खूप मनाला वेदना होत असतात.मानसिक स्वास्थ्य बिघडू लागते. कुठेतरी शांतता भंग पावत असते. पण यामुळे आपण सतत भविष्याच्याच विचार करत बसायचा का ? तर अजिबात नाही.जेव्हा जेव्हा अशी मनस्थिती होते तेव्हा तेव्हा खूप शांत राहणे गरजेचे असते. खूप संयम दाखवावा लागतो.आणि मुख्य म्हणजे अशी परिस्थती असूनही आनंदी राहणे गरजेचे असते. याने काय होते? तर पुन्हा उभे राहण्याची जिद्द निर्माण होते.माणूस कणखर बनतो.समजूतदार बनतो. आणि मग हळूहळू अगदी जादू व्हावी तसे काहीतरी छान, चांगले घडू लागते.

हो नक्कीच घडते.आहे तसे आयुष्याला सामोरे गेले तर आयुष्य हळूहळू आपल्याला आश्चर्यचकित करून टाकते.पण हे सर्व घडेपर्यंत आपल्याकडे खूप जास्त संयम, स्वनियंत्रण असावे लागते.भविष्याचा विचार जरूर करा, प्लॅन बी जरूर तयार ठेवा.पण इतकाही भविष्याचा विचार करू नका की वर्तमान निघून गेलेला देखील कळणार नाही.

भविष्याचे प्लॅनिंग जरूर करा, पण आयुष्याची ही पण एक बाजू जगून पहा….. आयुष्य तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडल्याशिवाय राहणार नाही.

साभार: आपलं मानसशास्त्र

ग्लोबल न्युज नेटवर्क: