माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन तसेच प्रवीण दरेकर तसेच इतर भाजपा नेत्यांनी काल नाशिक दौरा केला होता. यावेळी नाशिकमध्ये एका रुग्णालयात गेले असता फडणवीसांना नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तसेच तेथून त्यांना आपला काढता पाय घ्यावा लागला होता. आता याच मुद्द्यवरून राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी गिरिश महाजन यांना टोला लगावला आहे.
जामनेर मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडून मुंबई- नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचा आव आणत असताना पेशंटच्या नातेवाइकांना समोर स्टंटबाजी करणे आता तरी सोडा. असा टोल संजय गरूड यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे. दवाखान्यात स्टंटबाजी करत असताना कार्यकर्ते व रुग्णालयाची यंत्रणेसोबत घेऊन फिरतात. प्रोटोकॉलमुळे यंत्रणा वेठीस धरली जाते. त्यामुळे तेवढ्या वेळेत रुग्णांकडे दुर्लक्ष होते.
आज सोशल डिस्टंसिंगचे तीनतेरा वाजवून, मोठा ताफा सोबत घेऊन हॉस्पिटल मधील आपली स्टंटबाजी एका सामान्य व सुज्ञ महिलेला सुद्धा कळते. त्या महिलेने फार योग्य सल्ला दिलेला आहे. त्या भगिनीचे स्वागत करत असून, तिने सुनावलेले खडेबोल एक सुज्ञ आमदार म्हणून आचरणात आणावे व महाराष्ट्रावर आलेल्या संकटाचे राजकारण न करता रुग्ण सेवा करावी असे आवाहन देखील गरूड यांनी महाजन यांना केले आहे.
बाहेरील दौऱ्यांवर आमदार निधी खर्च करण्यापेक्षा जामनेर तालुक्यातील आरोग्य सेवेवर आपला आमदार निधी खर्च करून मतदारसंघातच रुग्णसेवा करा. आता तरी या महिलेने दिलेल्या प्रसादाचा आपणास जामनेर तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी सद़् विवेक बुध्दी मिळण्याचा लाभ मिळो ही तालुक्याची अपेक्षा