अद्याप मुंबईतील महाविद्यालये बंदच राहणार राज्य सरकारचा निर्णय

मुंबईतील महाविद्यालये आणि कॉलेजेस बंद ठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. कोरोना परिस्थिती आढावा बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर येत आहे मुंबई शहर भागातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत २२ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे.

तसेच मुंबई सोडून राज्यातील सर्व महाविद्यालये सोमवार पासून सुरु होत असली तरी मुंबईतील महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय कोरोनाच्या दृष्टीने घेतलेला आहे. मुंबई पालिकेने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली नसल्याने राज्यातील इतर अनेक भागातील महाविद्यालये सुरू झाली तरी मुंबई शहर आणि उपनगरातील महाविद्यालये बंदच राहणार आहेत.

तसेच ११ वीच्या ऍडमिशन्ससाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अपरिहार्य कारणामुळे ज्यांना प्रवेश घेता आले नसतील त्यांच्यासाठी ही मुदतवाढ आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचे आहेत. मात्र ही अखेरची संधी असणार आहे. यानंतर अकरावी प्रवेशांसाठी मुदतवाढ मिळणार नाही.

Team Global News Marathi: