राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींवर आता राष्ट्रवादीतूनच गंभीर आरोप झाले आहेत. हे आरोप एखाद्या विरोधकांकडून नव्हे तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून हा आरोप झाल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.अमोल मिटकरी यांच्यावर कमिशनखोरी त्याचसोबत महिलांची प्रकरणं दडपण्याचा आरोप करण्यात आला आहे.
अकोल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी मिटकरींवर हे आरोप केले आहेत. मोहोड म्हणाले की, मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि पक्षशिस्त मला माहिती आहे. त्यामुळे मी कुठल्याही वृत्तपत्र अथवा जाहीरपणे आरोप केले नाही. मी प्रदेशाध्यक्षांकडे सगळे आरोप केले. ही व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमात व्हायरल झाली.
अमोल मिटकरींवरील गंभीर आरोपावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. “स्त्री सन्मानावरून जगाला ज्ञानामृत पाजणाऱ्या सुप्रिया सुळे आणि रूपाली चाकणकर आहेत तरी कुठे?” असा खोचक सवाल विचारला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
अकोला राष्ट्रवादीतील वादाचा तिसरा अंक; मिटकरींचे एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा जिल्हाध्यक्षांचा दावा. स्त्री सन्मानावरून अवघ्या जगाला ज्ञानामृत पाजणाऱ्या सुप्रिया ताई सुळे आणि रूपालीताई चाकणकर आहेत तरी कुठे?” असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.