राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या फोटोची राज्यभरात चर्चा

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या फोटोची राज्यभरात चर्चा
विधानसभा २०१९ निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक मतबल नेत्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यात काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा भाजपात जाहीर प्रवेश केला. मात्र काँग्रेसमध्ये असताना विखे पाटलांना जे स्थान होते ते स्थान आता भाजपात नसल्याचे दिसून येत आहे,

असाच एका फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर याच फोटोची चर्चा सुरु झालेली आहे. हा फोटो आहे अण्णा हजारे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राळेगणसिद्धीतल्या प्रेस कॉन्फरन्सचा. ही प्रेस कॉन्फरन्स दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २९ जानेवारीला सायंकाळी पार पडली होती.

या फोटोत देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या बाजुला अण्णा हजारे आहेत आणि त्यांच्या बाजुला केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी आहेत. ह्या तीन मोठ्या नेत्यांसोबत फोटोत राधाकृष्ण विखे पाटील मागे कार्यकर्त्यांसोबत उभे असलेले दिसून येत आहे. आज नगर मधील इतक्या बड्या नेत्याला मागे कार्यकर्त्यानसोबत उभे राहावे लागले आहे अशीच काहीशी चर्चा नगरमध्ये होताना दिसत आहे. त्यात विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: