दसरा दिवाळीपूर्वी राज्यातील मंदिरे उघडणार का? राजेश टोपे म्हणतात की,

 

मुंबई | राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील मंदिरे बंद करण्याचा निर्णय ठकरे सरकारने घेतला होता. दरम्यान, आता राज्यात कोरोनाची रुग्ण कमी होत असून संसर्गाचा धोका कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे सर्व बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही मंदिरं आणि चित्रपटगृह उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही.

त्यातच राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यासाठी भाजपकडून घंटानाद आंदोलन छेडण्यात आले होते. यावर, आता मंदिरे उघडण्याचा निर्णय हा दसरा आणि दिवाळीनंतर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. जालना येथे पत्रकार माध्यमंही बोलताना त्यांनी हे महत्वपूर्ण माहिती मीडियाला दिली आहे. त्यामुळे लवकरच आता मंदिरे उघडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राजेश टोपे यांनी म्हटलं आहे की, ‘मंदिर उघडण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतात. सध्या गौरी गणपती सुरू असून त्यानंतर दसरा आणि दिवाळीचा सण देखील येणार आहे, दरम्यान, जर राज्यात कोरोना आटोक्यात आला आणि कोरोनाचे आकडे कमी झाले तर दसरा – दिवाळी नंतर राज्यातील मंदिरे पुन्हा भाविकांसाठी खुली केली जाऊ शकतात, असा सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.

Team Global News Marathi: