राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

 

पुणे | राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती. अखेर रुपाली चाकणकर यांना संधी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा महिला आयोगवर राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व दिसून आले आहे.

राष्ट्रवादीने या पदासाठी रुपाली चाकणकर, विद्या चव्हाण आणि चंद्रा अय्यगार या तीन नावांचा विचार केला आणि त्यातून आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी त्यांच्या या नेमणुकीवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी घणाघाती टीका केली आहे

दौंडमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रुपाली चाकणकर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा राहिला आहे. लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबाच्या सदस्य झाल्या आणि चाकणकर कुटुंबाला राजकीय पर्श्वभूमी असल्याने राजकारणात उतरत त्यांनी यशही मिळवलं. रुपाली चाकणकर आपल्या आक्रमक भाषणशैलीने ओळखल्या जातात. रुपाली चाकणकर यांनी राज्यभरात राष्ट्रवादी महिला संघटन मंजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. रुपाली चाकणकर यांच्या नियुक्तीबीबत महाविकास आघाडीतही एकमत आहे.

Team Global News Marathi: