राज्यात आज राजकीय भूकंप? आदित्य ठाकरेंनीही दिले संकेत

 

मुंबई | महाविकास आघाडीच्या नेते आणि मंत्र्यांच्या मागे काही दिवसांपासून ईडीच्या चौकशीच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून मोठा खुलासा करण्याचे संकेत दिले आहे. त्यावर ‘आधी टॉस होऊ द्या, मग बॅटिंगचं बघू’ असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही भाजपविरोधात संघर्षाचे संकेत दिले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडून ईडी सारख्या संस्थेचा गैरवापर होत असल्याचा वारंवार आरोप केला. काही दिवसांपूर्वीच प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली. त्यानंतर राऊत यांनी उद्या मंगळवारी पत्रकार परिषदेची मोठी घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेबद्दल शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांची सूचक प्रतिक्रिया दिली. ‘आधी टॉस होऊ द्या मग बॅटिंग काय करायची ते पाहू’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहे. उपराष्ट्रपतींना पत्र लिहिल्यानंतर राऊत यांनी आज पुन्हा एकदा ईडीविरोधात एल्गार पुकारला आहे. ‘महाराष्ट्रच्या जनतेचं लक्ष उद्या माझ्या पत्रकार परिषदेकडे हवं. उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे. जनतेला माझी उद्याची पत्रकार परिषद ऐकायलाच हवी. केंद्रीय तपस यंत्रणाचे प्रमुख आहेत त्यांनी ऐकायला हवी. उद्या शिवसेना पक्ष नाही, तर महाराष्ट्र,मराठी माणूस बोलणार आहे, तुमचे धंदे उद्या बंद होतील’ असा इशाराच राऊत यांनी दिला आहे.

Team Global News Marathi: