महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांविरोधात स्वाभिमानी संघटना आक्रमक,

महाविकास आघाडी सरकारपुढील अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. महाविकास आघाडी सरकारचा मित्रपक्ष असेलल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत आघाडीच्या मंत्र्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

स्वाभिमानी संघटनेने दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन केले होते. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला मोर्चा राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे वळवला आहे. स्वाभिमानीं सहकार मंत्र्यांच्या कारखान्यानं एफआरपीचा नियम मोडल्याचा आरोप करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ऊसाच्या एकरकमी एफआरपीच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. एक रकमी एफ.आर.पी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राजाराम बापू साखर कारखाना येथे ठिय्या आंदोलन केल्यानंतर आता त्यांनी त्यांचा मोर्चा सातारा जिल्ह्याकडे वळवला आहे.

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री कारखान्यानेच एफआपीचा नियम मोडला, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

Team Global News Marathi: