‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप !

 

मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेशी बेईमानी करत शिवसेना, ठाकरे सत्तेत आले आहेत. मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि ती लपून राहिलेली नाहीये असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर असल्याचा गंभीर आरोपही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, आयटी विभागाच्या छापेमारीतून जे त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला झोपच यायला नको.

राज्यात इतकी प्रचंड दलाली सुरू आहे… खरं म्हणजे ही दलाली इतक्या स्तरावर पोहोचली आहे की, काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलं आहे असं आयटीच्या छापेमारीत लक्षात येत आहे. हे महाराष्ट्रात सुरू असेल तर ईडी, सीबीआय राज्यात येणारच. जनतेशी बेईमानी करुन सत्तेत देवेंद्र फडणवीसांनी पुढे म्हटलं, मुख्यमंत्रिपदी असल्याने ठाकरे विसरले, जनतेने भाजपला नाकारलं नाही असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: