कळव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

 

ठाणे  | राज्यात एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकार स्थापन करून एकत्र सत्तेतच उपभोग घेत असताना दुसरीकडे मात्र स्थानिक राजकारणात या तिन्ही पक्षात वाद होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच कळव्यात शनिवारी घेण्यात येणाऱ्या लसीकरणाचे बॅनर राष्ट्रवादीकडून लावण्यात आले होते.

मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी ते बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत थेट टीव्ट करुन पोलिसांनी याची तत्काळ दखल घेतली नाही तर पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करतील असा इशारा दिला आहे. दुसरीकडे याच मुद्यावरुन राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी या लसीकरणावरुन थेट शिवसेना आणि पालिका प्रशासनावर टिका केल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.

कळव्यात शनिवारी मोफत लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तयनुसार या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन आव्हाड यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केले होते. त्यानंतर तशा आशयाचे बॅनर देखील कळव्याच्या विविध भागात लावण्यात आले होते. परंतु रात्रीच्या सुमारास येथील बॅनर अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या लोकांना फाडल्याची घटना समोर आली आहे.

तर दुसरीकडे मंत्री जोतेंद्र आव्हाड यांनी ट्विट करूनअशा गुंड प्रवृत्तींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन उभे केले जाईल असा इशारा देखील दिला आहे. दुसरीकडे याच मुद्याला धरुन राष्ट्रवादीचे ठाणो शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पुढील २४ तासात पोलिसांनी अटक करावी अन्यथा कळवा पोलीस ठाण्याला घेराव घातला जाईल असा इशारा त्यांनी दिला. आहे. तसेच लसीकरण मोहीम ही महापालिकेची असतांना शिवसेनेकडून लसीकरण मोहीमेच्या ठिकाणी बॅनर कसे लावण्यात आले असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच लसीकरण बनविण्याचे तंत्रज्ञान शिवसेनेने आत्मसात केले आहे का? असा सवाल त्यांनी शिवसेना आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना केला आहे.

Team Global News Marathi: