राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार? संजय राऊत म्हणतात की,

 

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीच खुलासा केला आहे.

ते आज मुंबईत पत्रकार माध्यमाशी बोलताना बोलत होते. राऊत म्हणाले की, अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे. असे काही होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष चालेल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. त्याविषयी मी त्यांच्याशी संवाद साधला. पण तुम्हाला वाटतं तसे राजकारण यात नाही, असं राऊत म्हणाले.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पवारांच्या आशीर्वादाने सरकार चालू असल्याचं विधान केलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार हे वयाने, अनुभवाने मोठे नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद सरकारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ते मान्य केलं आहे. अमोल कोल्हे राणा भीमदेवी थाटात बोलले असतील. पण हे तीन पक्षांचे सरकार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: