“२०२४ पर्यंत वाट पाहावी लागणार नाही, लवकरच मोदी सरकार कोसळणार”

 

संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवले असताना कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आज कोरोनाच्या संकटाबरोबर कोरोनाला रोखण्यात आलेले अपयश, वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे.

आज सपशेल फेल ठरलेले सरकार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करेल असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच आता केंद्रातील मोदी सरकार हे २०२४ पर्यंत सत्तेत राहणार नाही, हे सरकार लवकरच कोसळेल आणि देशात मध्यावधी निवडणूक लागेल, असे भाकित हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी केला आहे.

ओमप्रकाश चौटाला म्हणाले की, भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील प्रत्येक नागरिक दु:खी आहे. मला असे दिसते की देशातील लोकांना २०२४ ची वाट पाहावी लागणार नाही. कुठल्याही वेळी देशात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात.

दरम्यान, ओमप्रकाश चौटाला यांनी हरियाणामधील सरकारवरही टीका केली आहे. राज्यात सध्या सत्तेवर असलेले भाजपा-जजपा सरकारही २०२४ पर्यंत सत्तेत टिकणार नाही. ही आघाडी पूर्णपणे कमकुवत झाली आहे. आमदारांवर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. इंडियन नॅशनल लोकदल सोडून गेलेल्या लोकांना आता त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. आता ते पुन्हा एकदा इंडियन नॅशनल लोकदलमध्ये येऊ इच्छित आहेत.

Team Global News Marathi: