राज्यात दंगे भडकविणाऱ्या वसीम रिजवीवर कारवाई करा, नवाब मलिक यांची मागणी

 

मुंबई | त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण होते. नांदेड आणि अमरावती जिल्यात याच पडसाद दिसून आले होते याच आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. या हिंसक कार्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वसीम रिजवीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मलिक म्हणाले की, मशीद पाडल्याच्या निषेधार्थ मुस्लिमांनी बंद पाळला होता. त्यामध्ये हिंसा झाली. या हिंसाचाराची आम्ही कठोर शब्दात निंदा करतो. वसीम रिजवी हा शिया बोर्डामध्ये अफरातफर करणारा आरोपी आहे. त्याने हिंसा घडविण्यासाठी वक्तव्ये केली, त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

तसेच आंदोलन करण्याचा लोकांचा अधिकार आहे. ज्यांनी आंदोलन पुकारले त्यांनी आंदोलनाचे नियोजन केलं पाहिजे. हिंसाचाराला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. वसीम रिजवी हे देशातील सलोखा बिघडेल यासाठी विधान करतात. त्यांनी शिया बोर्डाने अफरातफर केली, याची तक्रार झाली. याचा तपास सुरू असून, अद्याप यावर कारवाई झालेली नाही. या रिझवीवर तात्काळ कारवाई करण्याची आमची मागणी असल्याचे मलिक म्हणाले.

Team Global News Marathi: