मोठी बातमी | दिल्लीच्या ‘त्या’ आंदोलनातील शेतकऱ्यांना पंजाब सरकार देणार २ लाख रुपये

 

पंजाब | केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत असून अनेकवेळा या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यातच पंजाब सरकारने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्यावर्षी २६ जानेवारी रोजी झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचा मोबदला देण्यात येणार आहे. या आंदोलनात पोलिसांनी एकूण ८३ समर्थकांना अटक केली होती.

चरणजीतसिंह चन्नी यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले की, काळ्या शेतकरी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनास माझे संपूर्ण समर्थन आहे. आम्ही २६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला होता. त्यावेळी, दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या ८३ आंदोलनकर्त्यांना पंजाब सरकारकडून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत करण्यात येईल.

२६ जानेवारी २०२१ रोजी केंद्र सरकारच्या ३ शेती कायद्याविरोधात संयुक्त किसान मोर्चा आंदोलनाद्वारे ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या ट्रॅक्टर रॅलीला त्यावेळी हिंसक वळण लागले होते, तेव्हा आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडून सुरक्षा रक्षकांवर हल्लाबोल करत लाल किल्ल्यावर किसान मोर्चा आंदोलनाचा झेंडा फडकविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी, लाल किल्ला परिसरात शेतकरी आंदोलनकर्ते आणि दिल्ली पोलिसांमध्ये खडाजंगी झाली, पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २०० शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी, ८३ शेतकरी आंदोलकांनी ही मदत देण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: