राज्यात पुढचे सात दिवस मुसळधार, अति मुसळधार पावसाचा इशारा !

 

मुंबई | राज्यासह मुंबईत ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा प्रभाव राहणार असून, ७ आणि ८ सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे. त्यामुळे किनारपट्टी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मागच्या काहीदिवसांपूर्वी आलेल्या मूलाधार पावसामुळे कोकसह पश्चिम महाराष्ट्राला यांचा सर्वाधिक फटका बसला होता.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. ६ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना हवामान विभागातर्फे ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

७ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि अकोला या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही पावसाच्या सरी कायम आहेत. सोमवारीही कमी अधिक फरकाने मुंबईत हीच परिस्थिती राहील, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

Team Global News Marathi: