सांगली | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना दिला होता.
सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका – अजितदादा पवार यांचा शेतकऱ्यांना सल्ला
कारण राज्याला लुटण्याचा अधिकार हा फक्त मविआ मंत्र्यांना दिला आहे.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 8, 2021
सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका – अजितदादा पवार यांचा शेतकऱ्यांना सल्ला
कारण राज्याला लुटण्याचा अधिकार हा फक्त मविआ मंत्र्यांना दिला आहे.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 8, 2021
या विधानावर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांवर निशाना साधला आहे. सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले आहे. खोत म्हणतात, सरकार तुमचंच आहे पण सरकारला लुटू नका- अजितदादा पवार यांचा शेतकऱ्यांना सल्ला. कारण राज्याला लुटण्याचा अधिकार हा फक्त महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना दिला आहे. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
काय म्हणाले होते अजित पवार
रस्ता रुंदीकरणामध्ये लोकांनी रस्त्याच्या बाजूला झाडं लावलीत. जो जमिनीचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहे. त्याच ठिकाणी लोकांनी झाडं लावली आहेत. दुसऱ्या बाजूला झाडे लावली नसल्याचे दिसून आले. यावर प्रांतधिकारी यांना विचारलं तर त्यांनी आंबा, नारळ याची झाडं लावली की जास्त पैसे मिळतात. त्यामुळे लोकं अशी झाडं लावतात असे सांगितले. त्यावर अजित पवार यांनी सरकार पण तुमचंच आहे सरकारला लुटू नका शेतकऱ्यांना सल्ला दिला.