राज्यात विधान परिषद जागेसाठी भाजपा उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज !

 

मुंबई | आज विधान परिषदेच्या जागेच्या उमेदवारीचे अर्ज भारतीय जनता पक्षाच्या वतीने भरले जाणार आहेत. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हे अर्ज भरण्यात येतील. मुंबई महापालिका नगरसेवक यांच्या मतदानातून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी भाजपाच्या वतीने आज दुपारी दोन वाजता राजहंस सिंह उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज भरणार आहे. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अशिष शेलार, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत. तसेच नागपूर येथे विधान परिषदेच्या रिक्त जागेवर चंद्रशेखर बावनकुळे आज अर्ज भरणार असून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करतील.

तर कोल्हापूर विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झालेले अमल महाडिक उमेदवारी अर्ज दाखल करणे या वेळेस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. धुळे येथून अमरिश पटेल , तर अकोल्यातून खंडेलवाल यांना भाजपाने उमेदवारी दिली असून हे देखील अर्जदार भरणार आहे. मुंबईतून विधान परिषद दोन जागा रिक्त त्याठिकाणी भाजपाकडून राजहंस सिंह, तर शिवसेनेकडून वरळी माजी आमदार सुनिल शिंदे यांना उमेदवारी दिली.

मुंबईतील विधान परिषदचेच्या दोन रिक्त जागेसाठी नगरसेवक मतदान करणार आहेत. सध्याची सेनेचे नगरसेवक ९७ भाजपाचे ८१ नगरसेवक आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाचे उमेदवार मताच्या कोट्यानुसार सहज विजयी होतात, मात्र अजून कोणी तिसरा उमेदवारी अर्ज दाखल केला तर मात्र चुरस वाढेल.

Team Global News Marathi: