कल्याण डोंबिवलीत शिवसेना देणार भाजपला धक्का, इतके नगरसेवक करणार प्रवेश ?

 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. मात्र दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे ५ नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होणार असून फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. भाजपाचे ५ नगरसेवक सेनेत प्रवेश करणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत भाजपचे हे 5 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

मुंबईमध्ये १५-२० नगरसेवक सेनेच्या वाटेवर? तर दुसरीकडे मुंबई महापालिकाची निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी भाजपचे १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्याच्या आधी सेनेत प्रवेश करतील, असा दावा करून एकच खळबळ उडवून दिला आहे. यशवंत जाधव यांच्या मोठ्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुर्वी सत्ताधारी विरूद्ध भाजप असे चित्र पहायला मिळत आहे.

Team Global News Marathi: