राज्य सरकारने लिहिले सिरम संस्थेला पत्र, केली ही मागणी वाचा !

मुंबई : संपुर्ण देशभरात १ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस टोचण्यात येणार आहे. मात्र सध्या राज्य सरकारकडे अल्प प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध असल्यामुळे लसीकरण मोहिम सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी राज्य सरकारने सीरमला पत्र लिहिलं आहे. आता थेट राज्य सरकारने सिरम संस्थेचे प्रमुख अदर पुनावाला यांनाच पत्र लिहिले आहे. तसेच या पात्रातून राज्य सरकारने दोन मागण्या केल्या आहे.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं, केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला वेग देत १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महाराष्ट्राला १२ कोटी लशींचे डोस आवश्यक असणार आहेत.

त्यामुळे लसीकरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी १ मे २०२१ पासून ते पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत आपण महाराष्ट्राला दरमहा किती कोविशिल्ड लशींचा पुरवठा करु शकता याबद्दल आम्हाला कळवावे. यासोबतच कोविशिल्ड लसीची किंमत किती असेल आणि इतर काही अटी असतील याचीही माहिती द्यावी असं पत्रात म्हटलं आहे. मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या लशींचा पुरवठा हे मोठं आव्हान आहे. लसीकरणासाठी राज्य सरकार तयार आहे. 7 हजार कोटींची लस लागणार आहे. त्यासाठी सीरम संस्था आणि भारत बायोटेकसोबत पत्र व्यवहार केला आहे.

Team Global News Marathi: