राज्य सरकारने तातडीने पूरग्रस्तांना मदत करावी, देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापुरात मागणी !

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या भागात जाऊन पाहणी केली होती. यावरी मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना टोला लगावला होता. “मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसून मदत जाहीर करणारा मुख्यमंत्री आहे” असा टोला लगावला. त्यानंतर फडणवीसांनी देखील या वर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मदतीला पॅकेज म्हणावं की मदत हा त्यांचा प्रश्न आहे. पण जे पण असेल त्याची घोषणा लवकर करावी. सामन्य माणसाला मदत लवकरात लवकर मिळाली पाहिजे. माझ्या दौऱ्यादरम्यान बऱ्याच लोकांकडून २०१९ च्या मदतीची आठवण करण्यात आली.

आमच्या सरकारमध्ये पाच हजार, १० हजार किंवा आणखी काही ही तातडीची मदत गरजेची असते. पूर ओसरल्यानंतर तातडीच्या मदतीच्या प्रतीक्षेत लोक असतात. व्यापाऱ्यांना देखील आता सरकारने मदत केली पाहिजे. सरकारने नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करावी ही आमची मागणी आहे.

अलमट्टी आणि राधानागरीचाही विसर्ग मोठा नाही. काही ठिकाणची उच्चपुर रेषा ही 2019 पेक्षा जास्त असल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरात जवळजवळ ३९६ गाव पुराने बाधित आहेत. दोन लाखांच्या पेक्षा जास्त लोकांवर परिणाम झाला आहे. प्रशासकीय इमारती, शाळा, घरे दुकाने यांचाही मोठं नुकसान झाले आहे. हे सगळं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारकडून जी काही तातडीची मदत यायला हवी होती ती अद्याप आलेली नाही असे पत्रकार परिषदेत बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: