करिना कपूरला आवडतं तूप, तंदुरुस्त राहण्यासाठी जेवणात करते वापर !

 

करीना कपूर खान आपल्या फिन्ससाठी सर्वत्र ओळखली जाते. झिरो फिगर ही संकल्पना तिच्यामुळेच लोकप्रिय झाली. आजही दुसऱ्या मुलाच्या गरोदरपणानंतर तिनं स्वतःच्या फिटनेसवर जास्त लक्ष दिल होत. फिटनेसच्या बाबतीत तिचा हात कोणीही धरू शकत नाही.

करिनाच्या या फिटनेसचं रहस्य काय याची उत्सुकता नेहमीच सर्वांना असते. पण करिनाला तूप खूप आवडतं आणि प्रत्येक जेवणात ती भरपूर तूप खाते. करिनाला तूप खूप आवडतं त्यामुळे ती आपल्या आहारात आवर्जून तुपाचा समावेश करते. गरोदरपणातही ती तूप खात असे. आपल्या फिटनेसचं रहस्य सांगताना, दररोज किमान एक चमचा साजूक तूप खाणं आवश्यक आहे, असं करिना म्हणते.

काही वर्षांपूर्वी करिनानं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या सल्ल्याप्रमाणे आपला आहार आणि व्यायाम करून झिरो फिगर मिळवली होती. आजही ती त्याच पद्धतीचा वापर करून आपला फिटनेस राखत आहे. स्लिम-ट्रिम राहण्यासाठी अभिनेत्री खूपच कठीण डाएट करतात. तेलकट पदार्थ, गोड खात नाहीत. तूप तर वर्ज्यच असते. अशावेळी झिरो फिगर राखणारी करिना मात्र प्रत्येक जेवणात तूप खाते म्हटल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटतं; पण तूपामुळे शरीर तंदुरुस्त राहतंच पण त्वचाही चमकदार राहते.

Team Global News Marathi: