राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. या घोषणेनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कटोहृद मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून राज्य सरकारचे आभार मानले आहेत. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ५ कोटी ७१ लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! असे ट्विट त्यांनी करून ठाकरे सरकारचे आभार मानले आहे.
पुढे आणखी एक ट्विट करत यांनी राज्य सरकार आणि केद्र सरकार यांना कोरोनाच्या संसर्गात एकत्र काम करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना संकटाशी सामना करताना केंद्र आणि राज्य सरकारला अशाच प्रकारे एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. जनतेला मी आवाहन करतो की, कोरोनाच्या या लढाईत लसीला शेवटचा उपाय न समजता मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगच्या सर्व नियमांचे पालन करा. जय हिंद ! जय महाराष्ट्र !! असे ट्विट त्यांनी केले आहे.
राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ५ कोटी ७१ लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! @OfficeofUT@AjitPawarSpeaks@rajeshtope11
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 28, 2021