राज्य सरकारने खाल्लेली दलाली मान्य करून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा – बबनराव लोणीकर

 

अतिवृष्टीमुळे मागील महिन्यात विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे पंचनामे न देता त्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी विरोधकांनी सरकारकडे केली होती. मात्र दुसरीकडे मंत्री अशोक चव्हाण यांनी थेट केंद्रावर खापा फोडले होते.

पीक विमा कंपनीशी करण्यात आलेल्या चुकीच्या कराराबाबत केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर आमदार बबनराव लोणीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांची जनतेची दिशाभूल केली आहे.

तसेच पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की, राज्य सरकारने खाल्लेली दलाली मान्य करून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. जर तसं जमत नसेल तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पीक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करा आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्यावा. असं केल्यावर मी स्वत: नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर त्यांचा जाहीर सत्कार करेन, असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: