भुजबळांनी भरसभेत वाचून दाखवली भाजप सरकारमधील घोटाळ्यांची यादी

 

नांदेडमधील देगलूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भाजप नेत्यांनी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांना ईडीच्या कारवाईची धमकी दिली आहे. आता त्यापाठोपाठ ‘किरीट सोमया नांदेडला येण्यापूर्वी भाजपच्या काळात झालेल्या घोटाळ्याचं काय झालं ते सांगा’ असा थेट सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी छगन भुजबळ आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी झालेल्या प्रचार सभेत छगन भुजबळ यांनी चौफेर तोफ डागली. ‘किरीट सोमया नांदेडला येणार आहे, पण कशासाठी येताय, अरे मुबंईला बसून आरोप करा असा सल्लाच त्यांनी यावेळी सोमय्यांना दिला आहे.

त्यापूर्वी भाजपाचं सरकार असताना तुमच्या नेत्यांनी केलेल्या घोटाळ्याचं काय झालं ते बघा, असं म्हणत भाजपा सरकारमध्ये असताना किती घोटाळे झाले याची यादीच भुजबळ यांनी भरसभेत वाचून दाखवली. भाजप नेत्यांच्या घोटाळ्याबद्दल सोमया का बोलत नाही, असा सवाल त्यांनी केला. अजित पवार यांनी आज भाजप संबंधित साखर कारखान्याची यादी दिली. सोमय्या तिकडे जा की, असा टोलाही भुजबळांनी लगावला.

Team Global News Marathi: