राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीचं समन्स

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्री खासदार आणि आमदारांना ईडीने नोटीस बजावली असून आता पर्यंत अनेकांवर कारवाईची टांगती तलवार लटकताना दिसून येत आहे. त्यातच आता राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतले प्रशासकीय अधिकारी सीताराम कुंटे यांना ईडीने मोतीचे बजावली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री देशमुख आणि अनिल परब यांनी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. वसुली प्रकरणाची चौकशी करत असतानाच ईडीने या प्रकरणासंदर्भात सीताराम कुंटे यांना समन्स बजावलं आहे. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना सीताराम कुंटे हे गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली.

सीताराम कुंटे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. कुंटे यांना 25 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल सीताराम कुंटे यांनी असमर्थतता दर्शवली आहे. मंत्रिमंडळाची बैठक असून, बैठकीला उपस्थित राहणं आवश्यक असल्याने चौकशीसाठी हजर होऊ शकत नसल्याचं कुंटे यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: