आता विद्यार्थ्यांना ‘ही’ महानगरपालिका देणार ५१ हजार रुपये

पुणे | पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. ८० ते ८५ टक्क्यांच्या वर गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महानगरपालिकेकडून ही रक्कम देण्यात येणार आहे. १० वी १२ वीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शारदाबाई पवार योजनेअंतर्गत ही रक्कम देण्यात येणार असल्याची घोषणा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली आहे.

या सन्दर्भाती माहिती सांगताना रासने यांनी सांगितले की, १० वीच्या १५८ विद्यार्थ्यांना आणि १२ वीच्या ३०३ विद्यार्थी असे एकूण ४६१ विद्यार्थ्यांना ही रक्कम देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अंदाजपत्रकात एक कोटी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वाटण्यात येणाऱ्या रकमेसाठी २ कोटी 35लाख ११ हजार रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे उर्वरित एक कोटी रुपयांची रक्कम पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मोफत बससेवेच्या तरतूदीतून देण्यात येणार आहे, अशी माहिती देखील हेमंत रासने यांनी दिली आहे.

यावर्षी कोरोनामुळे पहिल्या सत्रात शाळा बंद असल्याने अंदाजपत्रकातील बहुतांश रक्कम शिल्लक आहे. ७ कोटी रुपयांपैकी बहुतांश रक्कम शिल्लक असल्याने त्यापैकी एक कोटी रुपयाचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचं हेमंत रासने यांनी सांगितलं आहे.

Team Global News Marathi: