राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे ठिपक्यांची रांगोळी, मुख्यमंत्र्यांचे आमदारांच्या कार्यशाळेत भाष्य

 

राज्याचा अर्थसंकल्प एका ठिपक्यांच्या रांगोळीसारखाच आहे. रांगोळीचे ठिपके म्हणजे राज्याच्या जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. रांगोळीचे ठिपके योग्यरितीनं एकमेकांशी जोडले गेले की रांगोळी पूर्ण होते. त्यात रंग भरले की ती आकर्षक होते. असंच राज्याच्या विकासाचं देखील आहे. सर्व प्रतिनिधींनी मिळून काम केलं तरच राज्याचा विकास साध्य करता येऊ शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यासह संपूर्ण जगभरातच आतापर्यंत आरोग्य सुविधांकडे हवं तसं लक्ष दिलं जात नव्हतं, ते आज एखा विषाणूनं सिद्ध करुन दाखवलं. कोरोना विषाणूनं वास्तवाची जाणीव करुन दिली. शिक्षण क्षेत्राच्याबाबतीतचं तसं आहे. पण गेल्या दीड वर्षात आपण जगात कुठेही नसेल अशा आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या. याचा आकडा समोर आला पाहिजे. कोरोना काळात इतर गोष्टींचे निधीही आरोग्य सुविधांकडे वळवावे लागले. याची संपूर्ण माहिती सविस्तर स्वरुपात समोर आली पाहिजे. जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं होत.

तसेच शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्दयावरून विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जनतेसमोर खोटं बोलून त्यांना खोटा धीर मी कधीच देणार नाही. मग माझ्यावर किती टीका झाली तरी चालेल, असं त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: