उत्तर प्रदेश हे राम राज्य नाही, किलिंग राज्य, ममता बॅनर्जी यांनी साधला योगी सरकारवर निशाणा

 

उत्तरप्रदेश | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे रविवारी एका केंद्रीय मंत्र्यांच्या पोराने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी गाळून ६ निष्पाप शेतकर्यांच्या जीव घेतला होता. या झालेल्या हिंसाचारात एका १९ वर्षीय शेतकऱ्याचाही मृत्यू झाला. या प्रकरणामुळे संपूर्ण देशाबाशरत संतापाची लाट पसरली आहे. तसेच मोदी आणि योगी सरकारवर संपूर्ण देशभरातून टीका होत आहे. आता त्यापाठोपाठ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा योगी सरकारवर टीका केली आहे.

उत्तर प्रदेशात ‘राम राज्य’ असल्याचा दावा भाजपा करते. पण तिथे ‘राम राज्य’ नाही, ‘किलिंग राज्य’ आहे. लोक मारलं जातंय आणि सरकार जमावबंदी लागू करते. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांची हत्या केली. आम्ही त्याचा निषेध करतो, तसेच आरोपांना लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने हिसांचार प्रकरणी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच घटनेतील मृत ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचंही आश्वासन दिलं आहे. मात्र अद्याप हे प्रकरण अधिक चिघळताना दिसून येत आहे.

Team Global News Marathi: