राज्यातील आणखी एका बँकेवर RBI ने पैसे काढण्यावर घातली बंदी

सध्या राज्यात सहकारी बँकांना उतरती कळा लागली आहे. अनेक बँकांवर विविध प्रकारचे निर्बंध RBI ने लागले आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील दोन बँकांवर कारवाई केल्यानंतर राज्यतील आणखी एक सहकारी बँक काही दिवसातच संकटात सापडली आहे.
RBI ने नाशिकमधील इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेमधून पैसे काढण्यावर बंदी घातली आहे. डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विमा योजनेच्या चौकटीत बँकेतील ९९.८८ टक्के ठेवीदार आहेत. या निर्णयामुळे बँकेतील ग्राहक चिंतेत पडले आहे.

RBI ने यासंदर्भात सांगितले की, सहा महिन्यांसाठी इंडिपेंडेंस बँकेमधून पैसे काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सध्याची आर्थिक स्थिती पाहता ठेवीदारांना बँकेच्या बचत किंवा चालू खाते तसेच अन्य कुठल्याही खात्यामधून जमा रकमेमधील कुठलीही रक्कम काढण्याची परवानगी नसेल. ठेवीदार हे ठेवींच्या बदल्यात कर्जाची फेड करू शकतात. त्यासाठीही काही अटी लागू आहेत असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने बुधवारी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर या बँकेवर अजून काही निर्बंध लादले. त्याअंतर्गत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कुठलेही कर्ज देऊ शकणार नाहीत. तसेच कुठल्याही कर्जाचे नुतनीकरण करू शकणार नाहीत. याशिवाय कुठलीही गुंतवणूक किंवा कुठल्याही रकमेची फेड करणार नाहीत.

Team Global News Marathi: