एसटी संपाचा तिढा सुटणार का?; गोपीचंद पडळकर म्हणतात की,

 

राज्यभरात एसटी विलीकरणाचा लढा एसटी कर्मचारी करत असून त्यांच्या मागण्या मान्य झाला नाहीत. गेल्या २ ते ३ आठवडे हा संप आजून आहे.आता यात एसटी प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे.त्यामुळे राज्यभरात एसटी विलीकरणाचा लढा एसटी कर्मचारी करत असून त्यांच्या मागण्या मान्य झाला नाहीत. गेल्या २ ते ३ आठवडे हा संप आजून आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानं वातावरण चांगलंच तापवलं होतं. यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. राजकीय वर्तुळातही खळबळ पहायला मिळाली.

मात्र काल एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यात आला. एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली. त्यामुळे आता तरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्या, असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र दुसरीकडे कर्मचारही आपल्या संपावर ठाम आहेत.

सरकारनं दिलेल्या वेतन वाढ करण्याच्या निर्णयावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोपीचंद पडळकर आज 11 वाजता सकाळी माध्यमांसमोर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी भूमिका घेणार आहे. त्यामुळे आता संप मागे घेतला जाणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ज्य सरकारनं वेतनवाढीची घोषणा करताच पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ सुरु झाली. यावेळी आम्ही जर राजकारण करतोय असं वाटत असेल तर संपातून बाहेर पडतो असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी दिला आहे.

Team Global News Marathi: