एसटी खासगीकरणाच्या दिशेनं? महामंडळाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय !

 

एसटी महामंडळाचे राज्य स्करमध्ये विलीनीकरण करण्या यावे या मागणीसाठी आंदोलन सुरु असताना दुसरीकडे राज्यभरातील बससेवा ठप्प झाली असतानाच विद्युत बस भाडेतत्त्वाने घेण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला महामंडळाने ९ नोव्हेंबरला ‘वर्क ऑर्डर’ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. महामंडळाच्या मालकीची ‘शिवाई’ विद्युत बसची बांधणी रखडलेली असतानाच खासगी विद्युत बससाठी थेट ‘वर्क ऑर्डर’ देण्याचा प्रकार पाहता, हे खासगीकरणच असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आता खासगी शिवशाहीच्या धर्तीवर महामंडळाच्या या बस धावणार असेही स्पष्ट झाले आहे. खासगी कंपनीची बस व चालक आणि महामंडळाचा वाहक या तत्त्वावर विद्युत बस महामंडळात दाखल होणार आहेत. या विद्युत बससाठी महामंडळ प्रतिकिमीसाठी ५७ रुपये मोजणार आहे. बारा वर्षांसाठी या बस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत.

या बसवर एसटी महामंडळाचे बोधचिन्हही असणार आहे. कंत्राटी शिवशाहीला महामंडळाकडून इंधन पुरविण्यात येत होते. या विद्युत बससाठी चार्जिंग स्टेशन आणि देखभालीची जबाबदारी संबंधित कंपनीकडे असणार आहे. यामुळे ही विद्युत बस प्रवाशांसह महामंडळाच्या दृष्टीने देखील फायदेशीर ठरणार आहे, असा दावा महामंडळाचा आहे.

Team Global News Marathi: