“जालना सहकारी कारखान्यात घोटाळा, पवारांच्या आग्रहानेच रिपोर्ट दाबण्याचा प्रयत्न”

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या आयांनी महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांचे गोठले बाहेर काढले होते. तसेच तात्यांच्या कारवाईनंतर अनेकांना ईडीने नोटीस बजावली होती . काही दिसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जवळच्या नातेवाईकांवर ईडीने कारवाईकारात डब्बा १०० कोटीची मालमत्ता जप्त केली होती. आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आरोप लागले आहेत.

सध्या सोमय्या हे ते जालना जिल्ह्यातील रामनगर सहकारी साखर कारखाण्याचा घोटाळा बाहेर काढत असून कारखान्यात शंभर कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच थेट आरोप केला. जरंडेश्व्रर साखर कारखान्यासारखाच जालना कारखान्यात घोटाळा झाला असून यामध्ये शरद पवार यांच्या आग्रहानेच त्याचा रिपोर्ट दाबण्याचा प्रयत्न झाला, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे की, ‘शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील रामनगर सहकारी साखर कारखाना बेनामी पद्धतीने, फसवणूक करून खरेदी करीत शंभर कोटींचा घोटाळा केला आहे. साखर कारखान्याची कोट्यावधी रुपयांची जमीनही बळकविण्याचा खोतकर यांचा प्रयत्न आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यात घोटाळा झाला तसाच घोटाळा हा जालना सहकारी कारखान्यात झाला आहे. खोतकर यांनी मुळे परिवारासोबत हातमीळवणी करून कोट्यावधी रुपयांच्या जमिनीवर कब्जा केला आहे. तसेच यामागे शरद पवार यांचाही हात असून त्यांच्या आग्रहाने हा रिपोर्ट दाबण्यात आला आहे, असाही आरोप सोमय्यांनी केला आहे.

Team Global News Marathi: