एसटी संपामुळे घरात पैसे नाहीत, म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं ‘हे’ पाऊल

 

 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या दोन महिन्यापासून एसटी कर्मचारी आंदोलन करत असून सध्या यातून कोणताही तोडगा निघालेला नाहीये अशातच परिवहन खात्याने कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. यातच काही आगारांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही आगारातील कर्मचारी अजूनही संप मागे घेण्यास तयार नाहीत.

एसटी संपामुळे अनेकांनी धक्कादायक पावलंही उचलली आहेत. अनेकांवर हालाकिची वेळ आली आहे. बिकट परिस्थितीचा सामना करत असताना अनेकांच्या कुटुंबियांचाही बांध तुटलेला पहायला मिळाला. अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आईच्या साडीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे.

अमर तुकाराम माळी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अवघ्या 20 वर्षांचा होता. सोलापूरमधील या अमरने वडील तुकाराम माळी यांना पैशाची मागणी केली. मात्र संपामुळे दोन तीन महिने पगार नाही, काम बंद आहे तुला पैसे कुठून देऊ असं वडिलांनी हताश होऊन सांगितलं. हताश होऊन आपल्या खोलीमध्ये जाऊन अमरने साडीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Team Global News Marathi: