‘चला हवा येऊ द्या’च्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे यांनी मागितली नारायण राणेंची माफी

 

मुंबई | चला हवा येऊ द्या झी मराठीवरील हा शो प्रेक्षकांसाठी हास्याची मेजवाणी घेऊन येत असतो. प्रेषकांना पोट धरून हसायला लावणारा हा शो आणि त्यामधील कलाकार नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधे नुकतंच ‘दिवाळी अधिवेशन’ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राजकीय नेत्यांवर काॅमेडी करण्यात आली.

मात्र भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर करण्यात आलेल्या काॅमेडीवर राणे समर्थकांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात नारायण राणेंवर केल्या गेलेल्या काॅमेडीवर वाद निर्माण झाल्यावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे व त्याच्या टीमनं नारायण राणेंची भेट घेत त्यांची हात जोडून माफी मागितली.

दरम्यान, नारायण राणेंची माफी मागताना निलेश साबळे आणि त्याच्या टीमनं म्हटलं की, आमच्या कार्यक्रमाचा उद्देश नेहमी प्रेक्षकांचं मनोरंजन करणे हाच राहिला आहे. यामुळे कोणाचीही भावना दुखवण्याचा आमचा कधीच उद्देश नव्हता. मात्र तरीही आमच्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे मी दिलीगीरी व्यक्त करतो.

 

Team Global News Marathi: