एसटी कर्मचारी संप | सरकारने नवीन २५०० उमेदवारांना रुजू करण्याचा निर्णय

 

राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी सुरु केलेला संप राज्य सरकारकडून आवाहन करुनही मागे घेण्यात येत नसल्याने राज्य सरकारने मोठे पाऊल उचण्याची तयारी सुरु केली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने आधी १००० च्यावर एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

त्यातच आता एसटी सेवा पूर्ण पदावर आणण्यासाठी सरकारकडून २५०० नव्या उमेदवारांना तातडीने कामवर रुजू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे नवे उमेदवार रुजू होईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे हा संप मोडीत काढण्यात येणार असल्याचे दिसत आहे. ज्या दोन ते अडीच हजार उमेदवारांची एसटी महामंडळाने आधी परीक्षा घेतली आहे. तसेच वाहन चाचण्या घेतल्या आहेत, त्या उमेदवारांना संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी. महामंडळाकडून तातडीने रुजू केले जाणार आहे.

मात्र दुसरीकडे कर्मचारी संपावर अद्याप ठाम आहेत. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, ही त्यांची मागणी कायम आहे. दरम्यान, पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी भीक मागो आंदोलन सुरू केले आहे. तर पुणे आणि नाशिक येथून शिवनेरी, शिवशाही बस पुणे आणि मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत. तसेच पुणे येथे शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. कंडक्टर संपावर असल्याने अधिकारीच बुकिंग करत आहेत. कंत्राटी चालकांना घेऊन शिवनेरी बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पुण्याहून मुंबईसाठी शिवनेरी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. भाडे तत्वावर घेतलेल्या २ शिवनेरी डेपोत लावल्या आहेत.

Team Global News Marathi: