‘भाजपची पोपट कंगना रणौतचा धिक्कार असो’

 

पुणे | सतत वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रानौत हिने काल भारताच्या स्वतंत्रबद्दल केलेल्या विधानानंतर देशात एकच संतापाची लाट पसरली आहे. त्यातच आज राष्ट्र्वादीने त्यांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. कंगना रणौत च करायचं काय, खाली डोकं वर पाय, भाजपची पोपट कंगना रणौत करायचं काय, कंगना राणावत माफी मागो, कंगना रणौतचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने कंगना विरोधात आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, ”वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतच्या स्टेटमेंटचा राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर निषेध करत आहे. या स्टेटमेंट ला अमित शाह आणि नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. त्यांना एकूणच देशाच्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास झाकायचा आहे. त्याचबरोबर एक मनुवादीवृत्ती पुढे आणायची आहे. त्यासाठी कंगना रणौतला पुढे ठेवून अशी पेरणी केली जात असल्याचा आमचा आरोप आहे. कंगना रणौत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

कंगना एका कार्यक्रमात म्हणाली की ‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले”, असे आक्षेपार्ह विधान कंगनाने एका कार्यक्रमात केले होते. त्यावरून कंगना टीकेची धनी ठरली असून, तिच्याकडून पद्मपुरस्कार परत घ्यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे. या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याबाबत बोलताना कंगनाने वादग्रस्त विधानांची परंपरा कायम राखत नव्या वादाला तोंड फोडले.

Team Global News Marathi: