एसटी बसेसचे स्टेअरिंग होमगार्डच्या हाती, राज्यभरात चार हजार जवान तयार

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या दोन म्हैन्यापासून एसटी कर्मचारी आंदोलन करत असून अद्याप हे आंदोलन अधिक चघळताना दिसून येत आहे. अशातच राज्य सरकारने सुद्धा आंदोलन करणाऱ्या कर्मचारी वर्गावर कारवाई करण्याचा बडगा उचलला असला तरी दुसरीकडे कामावर रुजू होण्याचे आव्हान कर्मचारी वर्गाला करण्यात येत आहे.

दरम्यान अद्याप हा संप मिटला नसून संप मिटेपर्यंत व राज्य शासनाला मदत करण्याकरता गृहरक्षक दल (होम गार्ड) तयार आहे. देशात, राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर होमगार्ड सैनिकांची त्याजागी नेमणूक करावी, अशी तरतूद राज्याच्या होमगार्ड अधिनियमात आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपात असल्याने थांबलेली प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी एसटी बसेसचे स्टेअरिंग होमगार्डच्या हाती द्या, त्यासाठी राज्यभरात चार हजार जवान तयार आहेत, अशी मागणी होमगार्ड विकास समिती परिवहन मंत्र्यांकडे करणार आहे.

राज्यातील चार हजार होमगार्ड जवान लालपरी चालवण्यास तयार आहेत.या जवानांकडे अवजड वाहन चालवण्याचा परवानादेखील आहे. त्यामुळे आम्ही कर्तव्य समजून राज्य शासनाला मदत व्हावी म्हणूण बसेस चालवायला तयार आहोत. त्यासाठी शासनाने आदेश काढावा, याची आम्ही वाट पाहत आहोत असा होमगार्ड संघटनेने दावा केला आहे.

Team Global News Marathi: